Saturday, 23 February 2019

Etiological consideration of vata vyadhi


              ETIOLOGICAL CONSIDERATION OF VATAVYADHI

DR. ANAND B.MORE.
                                                           Professor, Roganidana Department
                                                                     B.V.D.U, College of Ayurved,
                                                                          Pune- 43 (Maharashtra)


  
Vata vyadhi are the important diseases of the body. As they take place in the Madhyama marga, these diseases are incurable for treatment. Vata vyadhi are described elaboratively in different samhita grantha.
 Vatavyadhi are said to be critical because Vata being the most powerful in all Dosha, having the capacity to manifest acute diseases, nature of diseases are severe, these diseases are difficult for management and needs Ayurvedic treatment.
 The etio-pathogenesis & clinical features of    vata vyadhi are  described precisely in each text.
Etiological factors of vata vyadhi are of different types. Today hetu described in ancient era has been changed; these hetu can be compared with the hetu of modern era.
Due to continuous consumption of hetu, Vata gets vitiated & aggravated to form different types of disease.     
According to hetu & sthana i.e. involved site of lesion it produces various types of diseases.
Jçç³ççíOçç&lçá#ç³ççlçd kçÀçíHçm³ç cççiç&m³ççJçjCçívç Jçç~
The vata gets vitiated by two  different causes i.e. 

1)                By the depletion of Dhatu (Dhatukshayajanya vata prakopa).
2)                By the occlusion of channels (Margavarodha janya vata prakopa.)
HETU OF VATAVYADHI:
©#çMççÇlççuHç uçIJçVç J³çJçç³çççÆlç ÒçpççiçjÌ ~
çÆJç<çcççoáHç®ççj½ç oçí<ççemç=kçÀñçJçCççoeçÆHç ~~
uçbIçvç HuçJçvç J³çç³ççcçççÆoçÆJç®çí<ìçÇlçíí ~
Oççlçávççbmçb#ç³ççlçd çÆ®çblççMççíkçÀ jçíiçççÆokçÀ<ç&Cççlçd ~~
JçíiçmçbOççjCççoçcççoççÆYçIççlççlç ~
cçcçç&yççOççod içpççíe<ì^MJçMççÇIç´³ççvççHçlçbmçvççlçd ~~
oíní ñççílççbçÆmç çÆjkçwlçççÆvç HçÓjçƳçlJççeçÆvçuççíyççÆuç ~
kçÀjçíçÆlç çÆJççÆJçOççvçd J³çççÆOçvçd mçbJçç&biçÌkçÀçbiç mçbÞç³ççvçd ~~ (®ç.çÆ®ç.28/15-19)

Therefore the hetu of vata vyadhi can be grouped in two ways for study purpose.
1)    DHATUKSHAYAKAR HETU:    
 Consumption of Ruksha i.e. dry or non fatty food items like pulses, air tight food, bakery products, bhel, junk food  etc.
 Shita i.e. cold water, cold-drinks, chilled food items etc.
  Laghu aahar i.e. light or low calorie diet of insufficient quantities.
Ati Vyavaya i.e. excessive sexual activities.
   Ati Jagarana i.e. awaking at night for a long period
Improper therapeutic procedure i.e.adminstration of therapies  which causes  excessive elimination of  Dosha and Rakta.
   Langhana i.e. fasting.
  Plawana i.e. swimming,
    Ati chankramana i.e. excessive walking
    Ati Vyayam i.e. excessive physical exercise
 Excessive riding on a horse, an elephant, a camel, or else fall from them.
In present times, excessive riding on bike, excessive traveling related to work.
Depletion of tissues (Dhatu)
Excessive emaciation due to Chinta i.e. worries. Presently due to fast life and global comepetition the evidence of  mental and physical stress & strain has been increased..
 Shoka i.e. grievances,
 Affliction of diseases
 Abhighat i.e. trauma or due accidents various types of vatavyadhi get manifested.
2) MARGAVARODHAJANYA HETU
Vega awarodha i.e. suppression of natural urges
Due to obstruction of Ama
Marma badha i.e. injury to vital part like head injury.
As we come across these hetu described or classified in ancient texts as above, we find difficulty to define particular hetu dravya. So we can elaborate these hetu  more according to type of dravya as below-
These hetu can be further classified in following ways
Ø Aharaj hetu:
 Ruksha i.e.dry or non fatty food items like pulses, air tight food,    
 Bakery products, Bhel, Junk food etc.
 Shita i.e. cold water cold-drinks, chilled food items etc.
 Laghu  ahara i.e. light or low calorie diet of insufficient quantities.
 Langhana i.e. fasting.
 Ama producing diet i.e. Agnimandyakar  ahara
Ø Viharaj hetu :
  Ati Vyavaya i.e. excessive intercourse
   Ati Jagarana i.e. awaking at night for a long period
   Plawana i.e. swimming,
   Ati chankramana i.e. excessive walking
   Ati Vyayam i.e. excessive physical exercise
              Excessive riding on an elephant, or camel, or horse or else fall from them.
Ø Ashuddha chikitsa:
Visham upachar i.e. inappropriate administration of Panchakarma & other therapeutic measures.
Dosha sravan and Rakta sravan i.e. excessive loss of Dosha, & blood.
           Rogati karshanat i.e. marked emaciation of the body due to  chronic diseases.
Ø Manas hetu:
Chinta i.e.  Excessive worry or stress
 Shoka i.e. grievances.
Ø Agantu hetu:
Abhighat i.e. trauma  
Marma badha i.e. injury to vital part like head injury.
Due to above said hetu sevan there will be either dhatu kshaya or margavarodha in the strotas which results in vitiation of vata
This vitiated vata dosha afflicting the patent channel of the body, gives rise to various generalized diseases or to those localized parts of the body.
From above discussion, we can conclude that Vata dushti hetu should be classified according to their etiogenic role, not by pathogenic role i.e. dhatukshayakara or margavarodhkara action. It will help us to define origin of disease .So that Nidanaparivarjana can be suggested more specifically and proper line of treatment can be given as per the causative factor.
********************************************************


Saturday, 26 January 2019

Adhunik Jivan shailiche dushparinam



                      आधुनिक जीवनशैलीचे दुष्परिणाम
                  डॉ आनंद  मोरे,  प्रोफेसर/ विभाग प्रमुख ,  
                 भारती विद्यापीठ  कॉलेज ऑफ  आयुर्वेद  पुणे  ४३.
                   मोबाईल  नंबर : ९४२२०२५७३२    ____________________________________________________________
पूर्वी उत्तम आरोग्य हि मोठी धनसंपदा मानली जात असे .परंतु आजकाल कुणालाही आपल्या शरीराकडे    लक्ष द्यायला  पुरेसा वेळा नाही .
जागतिकीकरणामुळे सर्व क्षेत्रात स्पर्धा सुरु झाली आहे. व या स्पर्धे मध्ये टिकून राहण्यासाठी माणसाने  गतिमान जीवन शैलीचा अंगीकार केला आहे. त्या साठी दिवस रात्र, तहान भूक,  विसरून वेगवेगळ्या तणावाखाली  काम  करत आहे , परंतु या सगळ्या आहार विहारातील बदलांमुळे  व विविध तणावांमुळे त्याला अल्पवयातच  वेग वेगळे विकार जडू लागले आहेत .
आपण वेगवेगळ्या बातम्या मध्ये पाहतो कि २५ वर्षाच्या तरुणाला हृदय विकाराचा झटका  किंवा कामाचा ताण असह्य झाल्यामुळे आत्महत्या केली. असे का  होऊ  लागले आहे ? याला कारण आहे आजची बदलती जीवन शैली.
आजच्या माहिती व  संगणक  तंत्रज्ञानाच्या  युगात  स्पर्धेत टिकून राहण्या साठी तंत्रज्ञ १८ ते २० तास काम करत असतात . आहाराच्या सवयीसुद्धा  बदललेल्या आहेत . फास्ट फूड , प्रक्रिया युक्त आहार ,पिझ्झा बर्गर चायनीज फूड मुळे  शरीराचे पोषण न होता वेगवेगळे विकार जडू लागले आहेत.
सततच्या कामाच्या ताण तणाव मुळे , रात्री जागरणांमुळे  व व्यायामाच्या अभावा मुळे  अल्प वयातच   उच्चरक्तदाब , मधुमेह, हृदयरोग, कंबर दुखी , मानसिक ताण , अल्सर  असे वेगवेगळे विकार पाहायला मिळतात. बदलत्या जीवन शैलीच्या प्रभावामुळे व्याधी कसा होतो हे थोडक्यात पाहू .
स्थौल्य :
स्थूलता बऱ्याच व्याधींची जननी मानली जाते. कारण त्यामुळे संधिवात, मधुमेह, उच्चरक्तदाब,   हृदयरोग , रक्तवाहिन्या टणक व अरुंद होणे इ. रोग होऊ शकतात. स्थौल्य हा विकार प्रगत देशां पेक्षा विकसनशील देशां मध्ये जास्त दिसू लागला आहे . हा विकार आर्थिक सुबत्ता व स्पर्धात्मक जीवन शैली  मुळे जास्त प्रमाणात दिसून येतो. विशेषतः उच्च कॅलरीयुक्त  आहार सेवन करणे, व्यायाम  किंवा  कष्ट  न करणे, मानसिक हेतू व अनुवंशिकता इ.गोष्टी मुळे यांचा दुष्परिणाम शरीरावर होऊन त्याचा परिणाम म्हणून स्थूलतेचे प्रमाण वाढले आहे.
स्थूल लोकां मध्ये कॅन्सरचे प्रमाण अधिक दिसते, तसेच त्यांचे वैवाहिक जीवन दयनीय होते, तसेच आयुष्यमान कमी होते. खूप लोक स्थौल्याला  स्वतंत्र व्याधी  मानत  नाहीत व त्याच्याकडे दुर्लक्ष करतात व त्याच्या मुळे निर्माण  झालेल्या  व्याधींची चिकित्सा करत राहतात. स्थौल्याची चिकित्सा करणे खूप कठीण असते, म्हणूनच आयुर्वेदा मध्ये  "न हि स्थौलस्य भेषज्यम " असे म्हंटले आहे .
मधुमेह:
स्थूलता व मधुमेहाचा निकटचा संबंध आहे. भारतामध्ये मधुमेहाचे प्रमाण खूप वाढलेले आहे, भारताला मधुमेहाची राजधानी मानली जाते, मधुमेह हा संतुलित कार्बोदक आहार, बैठे काम करणे, श्रम न करणे,  इन्सुलिनचा अभाव व अतिरिक्त मानसिक ताण यामुळे दिसून येतो. याचे  प्रमाण तरुण लोकांमध्ये अधिक दिसूं लागले  आहे. कारण तरुणांमध्ये कामाची स्पर्धा ,आर्थिक अस्थिरता, कामाचा ताण अधिक दिसूंन येतो विशेषतः आय टी   क्षेत्रा मधील व्यक्तीं  मध्ये   याचे प्रमाण अधिक दिसून येते .
मधुमेह हा अनेक रोगांना निमंत्रण देतो उदा.  स्थौल्य, हृदयरोग ,उच्च रक्तदाब .
हृदय विकार:
हृदय विकार हा स्थूल तसेच मधुमेह असणाऱ्या व्यक्ती मध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो .
हृदयरोगाची सद्य काळातील कारणे पुढील प्रमाणे दिसून येतात. अधिक शारीरिक श्रम करणे, मांसाहार   ,चरबी युक्त पदार्थांचे अधिक सेवन, सातत्याने मानसिक तणावा खाली राहणे किंवा भावनांचा प्रक्षोभ  होणे, अधिक प्रमाणात धूम्रपान करणे इ.गोष्टी मुळे यांचे प्रमाण जास्त दिसून येते. अलीकडे पाश्चिमात्यांकरणा मुळे नौकरीची स्पर्धा, अधिक श्रम करणे व तरुणांमध्ये धूम्रपान व  मद्यपान  यांचे प्रमाण वाढले आहे, व त्याची  परिणती हृदयरोगामध्ये होत आहे .
मानसिक ताण :
यांचे प्रमाण आजकाल खूप वाढले आहे. आयटी क्षेत्रामध्ये कामाचा ताण प्रचंड प्रमाणात असतो व त्यामुळे नौकरी टिकवण्याची  स्पर्धा, आर्थिक अस्थिरता व असंतुष्ट वैवाहिक जीवना मुळे अशा व्यक्तीं  मध्ये  चिडखोरपणा वाढतो व त्यामुळे हे लोक समाजामध्ये, मित्रमंडळींमध्ये  हे  सामावून जात नाहीत व त्यांचा एकलकोंडे पणा वाढत जातो. त्यामुळे मानसिक ताण सहन न झाल्यामुळे अशा लोकां मध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे .
कंबरदुखी :
कंबरदुखी हि सामान्यतः वृद्धा अवस्थेतील आजार मानला  जातो. परंतु आजकाल याची सुरवात तरुण अवस्थेपासून  झालेली आढळून येते. याचे कारण म्हणजे नौकरी निमित्त दुचाकीवरून अधिक प्रवास करणे , किंवा कॉम्पुटर समोर एकाच  स्थिती मध्ये बराच वेळ बसून राहणे, चुकीच्या आसन पद्धतीमुळे पाठीच्या मणक्यांची झीज होऊ लागते, त्या मुळे कंबरदुखीचे प्रमाण अधिक  झाले आहे .
अल्सर:
वेळी अवेळी खाणे, तिखटतेलकट खाणे, चायनीज पदार्थ खाणे, फास्टफूड खाणे, धूम्रपान करणे, तंबाखू सेवन, व मद्यपान करणे, अतिरिक्त मानसिक ताण यामुळे आमाशया मध्ये व्रण (अल्सर )निर्माण होतो.  आजकाल तरुणपिढी मध्ये वरील कारणाचे सेवन जास्त होते, व त्यामुळे तरुणांमध्ये अल्सर होण्याची शक्यता वाढते .
निद्रानाश:
आयटी  व बीपीओ  सेंटर मध्ये रात्र पाळी मध्ये काम करावे लागते, तसेच आजची  तरुणाई नेट  कॅफे  मध्ये रात्रभर  कॉम्पुटर समोर  बसतात, रात्रीचे जागरण, पार्ट्या, तसेच पिक्चर  पाहणे , मानसिक ताण इ . कारणामुळे   निद्रानाश विकार जडू शकतो .
अशा प्रकारे या बदलत्या  जीवन  शैलीचा खूप प्रभाव जनसामान्यांवर पडला आहे ,त्यामुळे वरील विकारांचे  प्रमाण वाढले आहे,या साठी आयुर्वेदा  मध्ये वर्णन  केलेल्या   दिनचर्या, ऋतुचर्या, आहारविधी  विशेषआयतनांचे जर पालन केले तर वर उल्लेख  केलेल्या  आजारांचे प्रमाण कमी होईल, व मनुष्य सुखी होईल.  
_____________________________________________________________________________________

Do's and dont's of Madhumeha



                                                                            मधुमेहातील पथ्यापथ्य           
डॉ . आनंद मोरे
प्रोफेसर , विभाग प्रमुख  , रोगनिदान विभाग ,
भारती विद्यापीठ अभिमत  विद्यापीठाचे , कॉलेज ऑफ आयुर्वेद, पुणे .
email : drmoreanand @ gmail.com
________________________________________________________________________________
प्रमेह या व्याधीचे  वर्णन आयुर्वेदात  सविस्तरपणे    आले आहे.  प्रमेहाचे  २० प्रकार  ग्रंथा मध्ये वर्णन  केलेले  आहेत  .  हा व्याधी जसा आहार विहार मानस कारणांनी होतो , तसाच तो अनुवांशिक म्हणून सुद्धा वर्णन केला आहे . या व्याधीची  चिकित्सा  व्यवस्थित  लवकर  केली  नाही तर   त्यांचे रूपांतर  मधुमेहामध्ये  होते. 
  प्रमेहाचे  साध्यासाध्यत्व  वर्णन करताना  कफज प्रमेह  साध्य , पित्तज प्रमेह याप्य    म्हणजे औषधी चिकित्सा चालू असेपर्यन्त  नियंत्रित राहतो. , बंद केली की  पुन्हा व्याधी  अनियंत्रित होतो.  वातज प्रमेह हे चिकित्सा  करण्यास   असाध्य  सांगितले आहेत.
 मधुमेह  हा वातज प्रमेहाचाच   एक प्रकार आहे.
 मधुमेह या व्याधींमध्ये  मुख्यतः  ओज दुष्टी झालेली असते  . सर्व धातू मध्ये शैथिल्य  आलेले असते . त्यामुळे धातूंमधील क्लेद वाढून वारंवार  गढूळ मूत्रप्रवृत्ती होते.
या व्याधीं  होण्यास   मुख्यतः आहार , विहार मानस हेतू  कारणीभूत  असतात.  आज च्या आधुनिक गतिमान जीवन शैली  मुळे  खाण्या पिण्यावर तसेच वागण्यावर बिलकुल नियंत्रण राहिले नाही . वेळी अवेळी खाणे  , जड किंवा पोषण मूल्य नसलेला आहार सेवन  करणे , गोड पदार्थ अधिक खाणे , सतत बैठे वातानुकूलित ऑफिस  मध्ये   काम करणे , अव्यायाम किंवा सतत कामाच्या टेन्शन मुळे चिंताग्रस्त असणे  या प्रकारची कारणे  सतत सेवन केल्यामुळे मधुमेहा सारखा व्याधी  होतो .
उपद्रव: हा  व्याधी  जर नियंत्रित ठेवला नाही  तर  त्या मुळे वेगवेगळ्या प्रकारचे उपद्रव शरीरामध्ये निर्माण होतात.   शरीरातील महत्वाच्या  अवयवावर परिणाम होऊन शेवटी मृत्यू येतो.  उदा. मज्जातंतू च्या विकृती , किडनीच्या विकृती, हृद्य विकृती ,  डोळ्या मध्ये विकृती. 
नियमित व्यायाम , समतोल आहार आणि संतुलित  वजन  याद्वारे  वैद्याच्या  सल्ल्यानुसार औषधी चिकित्से द्वारे  हा व्याधी बरा होऊ शकतो.
 त्यामुळे चिकित्सेचा विचार करताना   पथ्यापथ्याला तेवढेच महत्व देणे आवश्यक आहे.  अन्यथा केवळ औषधी चिकित्सेने या व्याधीवर  नियंत्रण ठेवणे  अवघड जाते .
विशेषतः अनुवांशिक कारण असणाऱ्या व्यक्तींनी  अधिक काळजी घेणे आवश्यक आहे .कारण अशा व्यक्ती मधुमेहासाठी अधिक सात्म्य असतात .  म्हणून चिकित्सेचा विचार करतांना  यामध्ये खालील प्रमाणे पथ्यापथ्य  पाळावेत.
पथ्य: 
पथ्याचा विचार करताना आहार विहार मानसिक संतुलन कसे साधता येईल याचा विचार केला पाहिजे .
आहार विचार :
मधुमेही साठी आदर्श असा   आहार नाही , परंतु काही मूलभूत गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
 आहार लघु गुणात्मक असावा . तंतू युक्त आहार सेवन करावा .
 सकाळी नाश्त्यामध्ये मोनोसॅच्युरेटेड  फॅट्स असणारे शेंगदाणे , बदाम खावेत.
जेवण दिवसातून वेळा   थोडे थोडे   घ्यावे . जेवणां मध्ये जास्त अंतर ठेवू नये . नाश्त्याची वेळ , दुपारी जेवणाची वेळ , मधली खाण्याची वेळ  रात्रीची जेवणाच्या वेळेची नोंद ठेवावी  त्यामुळे  अवेळी खाण्याच्या सवयी कमी होतात .    
जेवणा मध्ये पाणी घ्यावे, जेवणानंतर लगेच पाणी घेऊ नये.
अन्न पदार्थ :  नाचणी ,  सातू , वरी चे तांदूळ    , भाकरी, खावीत
  तांदूळ भर्जित जुना वापरावा .
भाजलेले  धान्य किंवा लाह्या चे सेवन करावे.   भाजल्यामुळे  धान्य लघु बनते  परंतु त्याचे आहार मूल्य कमी होत नाही   ,  परंतु  त्याचे अभिष्यंदत्व कमी होते. त्यासाठी भाजणी चे पदार्थ , मेतकूट उत्तम .    भर्जित धान्य मध्ये स्नेहांश कमी असतो .
कड धान्ये : हरभरे  , कुळिथ , मूग ,  घेवडा वाटाणा  धान्ये.
कर्बोदके : ज्यांच्या माध्यमातून विघटन हळूहळू होऊन शरीराला नियमित ऊर्जा पुरवठा करतात  असे पदार्थ कांदा धान्ययुक्त आहार , शेंगा , शेंगदाणे , ताज्या भाज्या , फळे .
 फळभाज्या : शेवगा , भोपळा , पडवळ ,  कडू भोपळा , मेथी , कोबी , मुळा , लसूण ,  कांदा , वाटाणा . गाजर , टोमॅटो ,  बीट , काकडी .
शाक वर्ग: गडद रंगाच्या हिरव्या पालेभाज्या  खाव्यात .  तिक्त शाक , मेथी , पटोला ,  शुंठी , ओली हरिद्राचे पदार्थ
 मांसाहार : अंड्याचा पंधरा भाग ,  श्वेत मांस , चिकन , मासे  योग्य आहेत . , शूल्य मांस -  सळईवर मांस लावून भाजलेले .
 फळे : जांभूळ , कलिंगड खजूर , संत्रा मोसंबी , पपई  डाळिंब  खरबूज  .
 पेय पदार्थ : हिंग , ओवा  मिश्रित ताक  प्यावे .
मद्य : नवीन मद्य वापरू नये ,  अगदी घेतलेच तर सामान्य मात्रेत  ३० ते ६० मिली  पर्यंत घ्यावे .
विहार :
विहारामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत  , तसेच ऋतूनुसार, काळानुसार  कसे आचरण करावे  याची माहिती येते .
दररोज  सकाळी  तीळ तैलाने अंगाला अभ्यंग करावे , नंतर उदवर्तन(उटणे लावून )  स्नान करावे . उदवर्तनामुळे शरीरातील कफ , मेद कमी होतो त्वचेला प्रसादन होते .
सकाळी उठल्यानंतर   ते       ग्लास  कोमट पाणी सेवन करावे .
  व्यायाम : विविध प्रकार  , आपल्या  वय , आवडीनुसार  झेपेल अशा  व्यायामाची निवड करू शकता .  व्यायामा मुळे   औषधाची मात्रा कमी होते  ,  सर्व साधारण प्रकृती सुधारते, व्यक्तीची मानसिक स्थिती सुधारते .
 कारण हा व्याधी मुख्यतः: कफप्रधान   मेदो दृष्टीचा  असल्यामुळे कफ कमी करण्यासाठी  रोज नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायाम नेहमी अर्धशक्ती करावा म्हणजे थकवा येत नाही .
  वजन जर नियंत्रित ठेवले तर शरीरातील इन्सुलिनचा उपयोग करण्याची क्षमता वाढेल. त्यामुळे रक्तातील साखरेचे मेदाचे  प्रमाण  कमी होते .
 )चंक्रमण :   चालणे हा सर्वात सोपा चांगला प्रकार आहे . पूर्वीच्या ग्रंथामध्ये  मधुमेहासाठी  चालणे हाच  उत्तम व्यायाम  सांगितला आहे. मधुमेही व्यक्तीने ४०० कोस प्रवास  करावा तोही उन्हात , छात्र घेता  चप्पल घालता  कडक आचरणाने करावा असे वर्णन केले आहे  . यामुळे शरीरातील क्लेद मेद यांची वाढ कमी होऊन  समस्थितीत  येतात. तसेच मांस मेदामुळे सिरा स्नायू पेशींचे शैथिल्य आलेले असते . ते कमी होते . तसेच मधुमेही व्यक्तीतील श्रम , ग्लानी ,तंद्रा आळस हि लक्षणे कमी होतात.
 तसेच उन्हामुळे रोगात  पातळ कफ  वाढलेला असतो तो कमी होतो .
) सूर्यनमस्कार   योगासने  :
दररोज चुकता सूर्यनमस्कार घालावेत. हळूहळू त्याची संख्या वाढवत  २४ पर्यंत जावे .
 योगासनांचा खूप चांगला उपयोग मधुमेह नियंत्रित करण्यासाठी होतो. परंतु योगासनांचा अभ्यास  तज्ज्ञ  मार्गदर्शनाखाली करावा .
दैनंदिन कार्यामध्ये सक्रिय राहावे. एखादा छन्द  जोपासावा जसे:  फिरणे , नृत्य , सायकल चालवणे .
दिवस झोप  घेऊ नये.
सतत  आराम करू नये .
 मानस हेतू :
  मन आनंदी प्रसन्न ठेवावे .
सतत चिंता , शोक करू नये.
 तणाव व्यवस्थापन साठी श्वसनाचे व्यायाम , योगासने     ध्यान धारणा  करावी.
अपथ्य:
आहार:
 आहार: नवीन ध्यान्य , तेल ,  क्षार , तूप , गूळ यासारखे पदार्थ सेवन करू नये. नवीन डाळी, कडधान्य ,  मका ,  बटाटा
 मांस सेवन करू नये. मांस गुरु गुणात्मक असल्यामुळे  पचायला जड जाते. लाल मांस , जास्त मेद युक्त मांस खाऊ नये.  अवयव युक्त मांस खाऊ नये.
 बेकरी जन्य पदार्थ   ,वेफर , चॉकलेट्स , मैद्याचे पदार्थ . आईस क्रीम ,मिठाई , दुग्धजन्य पदार्थ ,  पिझ्झा  यामध्ये ट्रान्सफॅट  असतात .
अधिक कॅलरीयुक्त पदार्थ सेवन करू नये.
असंपृक्त मेद ट्रान्सफॅट चे पदार्थ टाळावेत . ट्रान्सफॅट चे प्रमाण  आहारीय पदार्थामध्ये वाढलेले आहे .   पाश्चात संशोधना नुसार ट्रान्सफॅट मुळे रक्तातील  साखरेच्या चयापचय  क्रियेत अडथळा करतात .  त्यामुळे  टाईप   मधुमेहाचे प्रमाण वाढलेले आहे .
 चाट , सामोसे, जिलेबी , वडापाव,   सारखे तळलेले पदार्थ हॉटेल मधील  खाद्य पदार्थ खाऊ नयेत.
फ्रोझन   प्रक्रिया युक्त अन्न , रेडी टू इट सारखे पदार्थ , जंक फूड  खाऊ नये.  हैड्रोजनीत वनस्पती मध्ये प्रक्रिया केलेले पदार्थ सेवन करू नये.
खारट चवीचे पदार्थ खाऊ नये. सोया सॉस , चायनीस पदार्थ टाळावेत,
 फळ: आंबा , द्राक्षे, केले , चिकू, , उसाचा रस ,  अननस ज्यामुळे साखरेचे प्रमाण वाढेल  .
मीठ साखरे सारखे पदार्थ  वर्ज्य   करावेत. त्यामुळे  हृदयाच्या रक्तवाहिनीच्या धोके कमी होतात.
मद्यसेवन करू नये.  धूम्रपान करू नये .
 विहार :  दिवसा झोप घेणे , आराम करणे ,  कष्ट करणे
मानस  :    सतत चिंता , शोक  करणे .
 अशा प्रकारे जर  पथ्यापथ्याचे पालन  केले तर मधुमेह नक्कीच नियंत्रणाखाली राहू  शकतो.
_____________________________________________________________________________________